औरंगाबादमध्यमधून इम्तियाझ जलील आमदार झाले. सहामहिन्यात मनपा निवडणुका झाल्या आणि त्यातही अल्पसंख्याक व दलित समाजाने पक्षाला अक्षरश डोक्यावर घेतले. 25 नगरसेवक निवडून आले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजनशी आघाडी करून या आमदार जलील खासदार झाले. मात्र नंतरच्या विधानसभा निवडणुकीत वंचितबरोबर जमले नाही. त्यामुळे शहरातील तिन्ही उमेदवारांना पराभव झाला. मात्र तरीही मतदान चांगले मिळाले. दरम्यान एप्रिलमध्ये होणार्या पालिका निवडणुकीसाठी पक्ष जोमाने उभे राहील असे वाटत होते मात्र इतर पक्ष तगड्या उमेदवारांच्या शोध प्रक्रियेत असतांना एमआयएम पक्षाची अजूनही तयारी झाल्याचे दिसून येत नाही. खासदार इम्तियाज दिल्लीत असून कार्याध्यक्ष डॉक्टर गफ्फार काद्री यांची चाचपणीच सुरू आहे. एमआयएमचे मुस्लिम बहुल भागात आज ही वजन आहे मात्र स्थानिक नेते वेट एन्ड वॉचच्या भूमिकेत तर इच्छुकांत चलबिचल दिसत आहे.